ठळक घडामोडी

JSS सिंधुदुर्ग तर्फे जिल्हा कारागृहात पेंटिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन!

कुडाळ : केंद्र शासन पुरस्कृत जन शिक्षण संस्थान (JSS), सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग येथील बंदींसाठी पेंटिंग व रंगकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
       जिल्हा कारागृहाच्या सभागृहात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री. कांबळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी JSS सिंधुदुर्गचे संचालक श्री. सुधीर पालव, कार्यक्रम अधिकारी सौ. चैत्राली शिर्के, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री. रमेश खरात व कारागृह कर्मचारी उपस्थित होते.
      कारागृहातील कैद्यांना मोठ्या संख्येने या प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला आहे. या प्रशिक्षणात भिंत रंगकाम, पुट्टी, प्रायमर, डाग-डुजी दुरुस्ती आणि डेकोरेटिव्ह पेंटिंगचे प्रात्यक्षिक व सैद्धांतिक ज्ञान दिले जाणार आहे.
     यावेळी मार्गदर्शन करताना JSS चे संचालक श्री. सुधीर पालव म्हणाले, “JSS ची कौशल्य प्रशिक्षणे संपूर्ण जिल्हाभरात राबवली जातात. परंतु ही प्रशिक्षणे घेण्याचा तेवढाच अधिकार कारागृहातील बांधवांनाही आहे. शिक्षण आणि कौशल्य हेच पुनर्वसनाचे प्रभावी साधन आहे. भविष्यात कैदी जेव्हा शिक्षा भोगून समाजात परततील, तेव्हा हे पेंटिंगचे प्रशिक्षण त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी भक्कम आधार देईल.”
      कारागृह अधीक्षक श्री. कांबळे यांनी देखील JSS च्या या उपक्रमाचे कौतुक केले व कैद्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना भारत सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!