ठळक घडामोडी

खासदार नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणरायाचे रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे आणि आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. ‘सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान’च्या वतीने खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे आणि आमदार निलेश राणे यांचा सन्मान करण्यात आला.
      यावेळी संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, दिपलक्ष्मी पडते, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, अॅड. राजीव कुडाळकर, सुनील बांदेकर, पप्या तवटे, रूपेश कानडे, सागर वालावलकर, अस्मिता बांदेकर, मंगेश चव्हाण, देवेंद्र नाईक, चेतन पडते, नागेश नेमळेकर आदींसह ‘सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गणेशभक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!