ठळक घडामोडी

पिंगुळी-कुडाळच्या मृणाल सावंतचा नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान!

‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

राज्यातील विविध क्षेत्रांतील ८० कर्तृत्वाचा सन्मान

सिंधुदुर्ग : पिंगुळी (कुडाळ) येथील कु. मृणाल अजय सावंत हिच्या उद्योजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तिला ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती उद्योगिनी महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते, सहाय्यक धर्मादाय आयुक्त अनामिका मोताळे आणि डॉ. सुनीता मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीत मृणाल सावंत हिचा नुकताच गौरव करण्यात आला.
      सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संजीवन उद्योग समूहाच्या वतीने नाशिक येथील रेशीमगाठी लॉन्स, सातपूर बसस्थानकाजवळ येथे ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ८० कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यात
मृणाल सावंत हिच्या कार्याची दखल घेत तिचा मिळालेल्या या पुरस्कारामुळे पिंगुळीसह कुडाळ शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध क्षेत्रांत उद्योग, स्वयंरोजगार आणि सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
      या वेळी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे प्रवर्तक तथा ‘जागृत नाशिक भारत अभियान’चे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद, महंत शंकरानंद सरस्वती, वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडले, धर्मादाय आयुक्तालयाचे अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त अनामिका मोताळे, आश्रय प्रतिष्ठान कुडाळचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक माधव गोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!