ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची बदली!

आता अपूर्वा बासूर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी

सिंधुदुर्गगरी : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आता श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी काढले असून, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांची बदली करण्यात आली आहे.
     अपूर्वा बासूर या सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग म्हणून कार्यरत आहेत. शासनाने त्यांची बदली करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
     शासन आदेशानुसार, बासूर यांनी त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार श्री. पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांच्याकडे सोपविल्यानंतर नवीन पदाचा कार्यभार रविंद्र खेबूडकर यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपूर्वा बासूर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत प्रशासन, पाणीपुरवठा तसेच विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आता त्यांच्यावर राहणार आहे.

error: Content is protected !!