ठळक घडामोडी

निवती पोलीस ठाण्यात पोलिस वेशातील गणेशमूर्ती!

कर्तव्याच्या वेशात गणरायाचे आगळे रूप; निवती पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह

कुडाळ : प्रतिनिधी
      वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्यात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पोलिस वेशातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पोलिस गणवेशातील बाप्पाचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून या अनोख्या गणेशमूर्तीचे कौतुक होत आहे.
       कर्तव्य बजावताना पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गणवेशातच गणरायाला साकारण्यात आले आहे. हातात पोलिसांचा दंडुका, अंगावर गणवेश आणि पोलिस अधिकारी म्हणून विराजमान असलेले बाप्पाचे हे रूप विशेष आकर्षण ठरत आहे.
     गणेशोत्सवाच्या काळात निवती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा करीत आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही या आगळ्यावेगळ्या गणेशमूर्तीचे दर्शन घेता येत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!