ठळक घडामोडी

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’!

‘सेवा संकल्प अभियान’तून दिव्यांग बांधवांना देवदर्शनाची संधी

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ आयोजित करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले.
     भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा ज्येष्ठ नेते राजू राऊळ, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, देवगड प्रभारी दीक्षा तेली, सावंतवाडी प्रभारी सविता गावडे, सावंतवाडी अध्यक्ष बाबुराव गावडे, मालवण प्रभारी रंजना इंदुलकर, वेंगुर्ले प्रभारी सुनील कांबळी, क्रीडा प्रभारी प्रशांत कदम, शासकीय योजना प्रभारी विजय कदम, कणकवली प्रभारी प्रकाश सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र मेस्त्री आदी उपस्थित होते.
     तसेच कार्यालयीन टीममधून साईप्रसाद भोई, मुकुंद तोरसकर, वृषभ तोरसकर, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक शामसुंदर लोक, सुनील तांबे, प्रकाश वाघ यांची उपस्थिती होती. दिव्यांग बांधव-भगिनींना देवदर्शनाचा आनंद मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सहभागी दिव्यांग बांधवांनी स्वागत केले. यात्रा सुखकर, आनंददायी आणि मंगलमय होण्यासाठी आयोजकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!