ठळक घडामोडी

चोरी, घरफोडी व संघटित गुन्हेगारीतील फरार संशयित आरोपी तुळजापूरमधून जेरबंद!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कामगिरी

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
        चोरी, घरफोडी आणि संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्यांत गेल्या वर्षभराहून अधिक काळ फरार असलेल्या संशयित आरोपी राहुल सुनील भोसले (वय २७, रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर परिसरातून ताब्यात घेतल्याची माहीती सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.
        सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र तो फरार होता. गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
       या संशयित आरोपीविरुद्ध गोव्यातील पेडणे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व वाहन चोरीचे, तर ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गकडून देण्यात आली.

error: Content is protected !!