
पाणी अडवा, पाणी जिरवा; पाचही वाड्यांतील ग्रामस्थ एकवटले
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी कविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात आला. कविलकाटे येथील पाचही वाडीतील लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील बहुमोल असा वेळ देऊन पाणी अडवा पाणी जिरवा या भावनेतून एकत्र येत श्रमदान केले. लोकसहभागातून जलसंधारणाचे काम करण्यात आले.या उपक्रमात ग्रामस्थ तसेच महिला उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे,पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे या उद्देशाने हे काम करण्यात आले.गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यामुळे लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
यावेळी पोलीस पाटील श्री.हेमंत मातोंडकर,नगरसेविका ज्योती जळवी,कुंदा जळवी, श्री.शैलेश जळवी,श्री.अरुण जळवी,श्री. समिल जळवी,रितेश जळवी,राजन जळवी, निलेश जळवी, मदन जळवी, प्रसाद जळवी, अरविंद जळवी,राजाराम गडेकर, संकेत आळवे,विलास जळवी, दीपक जळवी,अभय जळवी,पापा गडेकर,संजय जळवी, रामदास जळवी,आशिष जळवी, श्री. कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कविलकाटे च्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेऊन केलेले हे श्रमदान कौतुकास्पद असून,अशा उपक्रमांमुळे जलसंधारणा बाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.लोकसहभागातून केलेला बंधारा हा जलसंधारण, श्रमदानातून गावाची समृद्धीकडे वाटचाल होईल.या श्रमदानात नगरसेवक अभिषेक गावडे यांनी जेसीबी चे सहकार्य केले तर, बाळकृष्ण नगर येथील श्री.विलास जळवी यांनी बंधाऱ्यासाठी लागणारी माती देऊन सहकार्य केले.









