ठळक घडामोडी

कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना!

ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे पूजन व आरती

सिंधुदुर्ग : कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
            दुर्गामातेच्या आगमनानिमित्त कणकवली पटवर्धन चौकातून  नरडवे फाट्यानजीक असलेल्या शिवसेनेच्या नवरात्रोत्सव स्थळापर्यंत देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि दुर्गामातेच्या जयघोषाने मिरवणुकीत उत्साहाचे  आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
       नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेचा दरबार आकर्षक सजावटीने सजविण्यात आला असून, आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सवस्थळ  अतिशय सुंदर आणि  नयनरम्य दिसत आहे.
         दुर्गामातेच्या मिरवणुकीत माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह शिवसेनेचे  पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.
         बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सवात दररोज देवीची नित्यपूजा, आरती तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
          यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,तालुकाप्रमुख राजू राठोड, विलास गुडेकर, सतीश नाईक, राजू शेटये, अनिल हळदीवे, राजू राणे, मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर, बबली राणे,महेश कोदे, उत्तम लोके, हर्षद गावडे, नंदिनी नाईक, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, प्रतीक्षा साटम, साक्षी आमडोसकर, रोहिणी पिळणकर, अर्पिता परब, रचना खांदारे, शोभा बागवे, अजित काणेकर, तेजस राणे, महादेव राठवड,रोहित राणे, रुपेश आमडोसकर, जगन्नाथ आजगावकर, रमाकांत राणे, विठोबा मर्ये, अक्षय कदम, सुरेश मोरे, वैभव सावंत, रवींद्र खांदारे, रमेश गावकर, संदीप वारंग, ओमप्रकाश ताम्हाणेकर, आनंद महाडेश्वर,  स्वप्निल पाटील, पराग म्हापसेकर, ओंकार चव्हाण,  अरुण परब यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!