ठळक घडामोडी

नृत्यांगना ते नवउद्योजिका; मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास!

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळात सत्कार

सिंधुरत्न प्रबोधिनी व गिअर अप जिमच्या वतीने गौरव

कुडाळ : मृणालचा नृत्यांगना ते नवउद्योजिका हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तिने या क्षेत्रात घेतलेली गरुड झेप खूपच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष डॉ संजय सावंत यांनी कुडाळ येथे केले.
     पिंगुळी येथील सिंधुरत्न प्रबोधिनी आणि गिअर अप जिम ॲन्ड वेलनेस सेंटर कुडाळ, पिंगुळी यांच्या वतीने नवउद्योजिका मृणाल सावंत हिला राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कार नुकताच नाशिक येथे देण्यात आला तिला मिळालेल्या पुरस्कारबाबत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिंधुरत्न प्रबोधिनी आणि गिअर अप जिमच्या वतीने डॉ. संजय सावंत, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी सौ. अनुप्रिया जाधव, सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मृणालचा गौरव करण्यात आला. यावेळी गिअर अपचे संचालक साईराज जाधव, प्रतीक्षा सावंत, पूजा जाधव, डॉ सुविधा वाळवे, पूजा नाडकर्णी, दर्शन मयेकर, अनिकेत सावंत, योगेश घाडी, काजल जावकर, जयंत रेगे, ओंकार शिरसाट, विनोद पिंगुळकर, निश्चय मसगे, कुणाल करनूरकर, ओंकार सावंत, राघव जाधव आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, मृणाल सावंत हिने वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्य क्षेत्रात मिळविलेले दैदिप्यमान यश हे निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारे होते. त्यानंतर तिने व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना अवघ्या दोन वर्षानंतर तिला नवउद्योजिका पुरस्कार मिळाला हा तिने केलेल्या कार्याचे निश्चितच फळ असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी सौ.जाधव यांनी  कला आणि व्यवसायाची प्रामाणिक राहून मृणालने जे यश संपादन केले ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना मृणाल सावंत हिने गेली 14 वर्षे नृत्य क्षेत्रात वाटचाल करताना माझे शेकडो सत्कार झाले पण खऱ्या अर्थाने जे जे यश मिळवले त्याच्यात पहिला सत्कार हा जाधव  कुटुंबीयांकडून झालेला आहे. माझ्या यशात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. कलेबाबत मला मिळालेली शाबासकीची थाप हे माझ्यासाठी प्रोत्साहन असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात हेमंत जाधव यांनी मृणाल सावंत हिने गेल्या 14 वर्षात नृत्यकलेसह तिने आपल्या व्यवसायात केलेल्या कार्याचा धावता आढावा घेतला आभार साईराज जाधव यांनी मानले

error: Content is protected !!