ठळक घडामोडी

घावनळे श्री स्वामी समर्थ मठात नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम!

१८ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल

श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना; भाविकांची गर्दी

कुडाळ :  घावनळे – कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ते रविवार, १८ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या उत्सवात भजन, जपमंत्र, महापूजा, महाआरती, महाप्रसाद तसेच पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापने दिवशी रविवारी मठात श्री दुर्गामेतेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
       रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मांडकुली यांचे भजन, रात्री ८ वाजता श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी आणि रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ, मातोंड यांचे भजन होईल. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता १०८ वेळा तारक मंत्र, सायंकाळी ७ वाजता भालचंद्र सोहम भजन ग्रुप, कुडाळ यांचे भजन, रात्री ८ वाजता हरिपाठ (वेताळ बांबर्डे), रात्री ९ वाजता सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पाट आणि रात्री १० वाजता ब्राह्मणदेव प्राथमिक भजन मंडळ, नमसवाडी यांचे भजन होणार आहे.
        मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता १०८ वेळा गायत्री मंत्र, सायंकाळी ७ वाजता अष्टविनायक भजन मंडळ, मांडकुली, रात्री ८ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, मांडकुली, रात्री ९ वाजता वावळेश्वर हनुमान प्रासादिक भजन मंडळ, तेंडोली आणि रात्री १० वाजता आनंद कानडे बुवा यांचे भजन होणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता चावडी महापुरुष भजन मंडळ, गावठणवाडी, रात्री ८ वाजता खोडदेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी आणि रात्री ९ वाजता विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, साळगाव यांचे भजन होईल.
       गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी, सायंकाळी ६ वाजता सिद्धिविनायक भजन मंडळ, भटवाडी-कोचरा, रात्री ७ वाजता खोडदेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, रात्री ८ वाजता साईकृपा भजन मंडळ, निरुखे आणि रात्री ९ वाजता स्वयंभू रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, अणाव यांचे भजन होणार आहे.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता नाणे भटवाडी प्रासादिक मंडळ, वेताळबांबर्डे, रात्री ८ वाजता माघी गणेश जयंती उत्सव मंडळ, खवणे आणि रात्री ९ वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, वाडोस यांचे भजन होईल.
        शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पैठणी कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता रामेश्वर भजन मंडळ, सावंतटेंब, घावनळे, रात्री ७ वाजता कलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरूर, रात्री ८ वाजता भगवती प्रासादिक भजन मंडळ, अणाव आणि रात्री ९ वाजता हनुमान मित्र मंडळ, माणगाव यांचे भजन होणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी आणि रात्री ९ वाजता रवळनाथ पावणाई प्रासादिक भजन मंडळ, वाडोस-मोरे यांचे भजन होईल.
उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ११.३० वाजता महा नैवेद्य व महाआरती, त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज दुपारी १२.३० वाजता १०८ वेळा देवीचा जपमंत्र होणार आहे. या नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॐ श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!