
आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; आशा स्वयंसेविकांचाही विशेष सन्मान
वाढदिवसाचे औचित्य साधत विशाल परब यांचा आरोग्यसेवेचा उपक्रम
वेंगुर्ले : वेताळ प्रतिष्ठान तुळस, भाजपा वेंगुर्ला आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा राज्य युवा नेते येथे विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, वेंगुर्लानगरीचे नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सौ. जठार, डॉ. चौगुले, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह विशेष सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
वेताळ प्रतिष्ठान तुळस आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच वेंगुर्ला तालुक्यातील आशा स्वयंसेवकांचा युवा नेते विशाल परब यांच्या वतीने विशेष भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन बादल चौधरी, निलेश गुरव यांनी केले. आभार प्रदर्शन बाळू देसाई यांनी केले. दरम्यान वेंगुर्ला येथील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा अत्यंत ऐतिहासिक व उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.









