ठळक घडामोडी

कुडाळ गोधडवाडीत शिवसेना शहर प्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या स्वखर्चातून वनराई बंधारा उभारणी!

जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचे काम; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

कुडाळ : कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे भविष्यात दुष्काळ पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून वनराई बंधारा उभारण्यात आला.
     जेसीबीच्या साहाय्याने या बंधाऱ्याचे काम करण्यात आले असून, यामुळे पावसाचे पाणी अडवून ते साठवण्यास मदत होणार आहे. परिणामी, दुष्काळसदृश परिस्थितीत स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या दिलासा मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
      अल निनोच्या प्रभावाने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढवणे महत्त्वाचे ठरते. याच उद्देशाने गोधडवाडी येथे वनराई बंधारा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमामुळे पाण्याचा प्रवाह अडवून स्थानिक पातळीवर पाणी साठवण्यास मदत होणार आहे.
      स्थानिक नागरिकांच्या पाणीसमस्येची दखल घेत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून हे काम करून घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. लोकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी अशा प्रकारचे स्थानिक पातळीवरील उपक्रम महत्त्वाचे ठरतात. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख प्रथमेश केळबाईकर, शाखाप्रमुख संदेश सावंत तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
      लोकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी केलेला हा उपक्रम गोधडवाडी परिसरासाठी उपयुक्त ठरणार आहे. पावसाचे पाणी अडवणे, जलसंधारणाला चालना देणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे, यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली जात आहे.

error: Content is protected !!