ठळक घडामोडी

कुडाळमध्ये वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत; वृक्षारोपण अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

गोवा ते नाणीजधामपर्यंत २४३ किलोमीटरचा प्रवास; कुडाळात वृक्षारोपण

वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन अन् प्लास्टिकमुक्तीचा जागर

कुडाळ : प्रतिनिधी
     पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित वसुंधरा पायी दिंडी आज बुधवारी सकाळी कुडाळमध्ये दाखल झाली. यावेळी दिंडीचे स्वागत करून वृक्षारोपण करण्यात आले.
      रामानंद संप्रदायाच्या गोवा उपपीठातून १० ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने निघालेली ही दिंडी गोवा, बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, तळेरे आणि खारेपाटण मार्गे २० ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे पोहोचणार आहे. अकरा दिवसांच्या या प्रवासात सुमारे २४३ किलोमीटरचे अंतर पार केले जाणार आहे.
     कुडाळ येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, नगरसेविका नयना मांजरेकर, डॉ. गौरव घुर्ये यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. रविकमल हॉल येथे विश्रांती घेतल्यानंतर दुपारी दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पाण्याची बचत करा आणि प्लास्टिकचा वापर टाळा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. दिंडीत मोठ्या संख्येने धामयात्री सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!