ठळक घडामोडी

डिगस, अणाव व हुमरमळा येथे जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून पंचनाम्यांचा आढावा!

वनराई बंधाऱ्यांची पाहणी; जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज कुडाळ तालुक्यातील डिगस, अणाव व हुमरमळा येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून नवीन वनराई बंधाऱ्यांच्या बांधणीसंदर्भातही आढावा घेण्यात आला.
     जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे, जलस्रोतांचे बळकटीकरण करणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. या दृष्टीने संबंधित गावांतील वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांची स्थिती जाणून घेण्यात आली.
     शेतीच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या पंचनाम्यांची माहिती घेत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्यावर भर देण्यात आला.

error: Content is protected !!