
नाटळ येथे नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा, त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा चौथा नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ (मुंबई) संचलित माध्यमिक विद्यालय, नाटळ येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात कुडाळ येथील नर्मदाआई संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संध्या प्रसाद तेरसे यांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या प्रेरणादायी योगदानाला सलाम करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.








