ठळक घडामोडी

शिवसृष्टीवरील रील स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाणचा डंका!

शिवकाळातील प्रसंग रीलमधून जिवंत; सिद्धेश चव्हाणने पटकावला अव्वल क्रमांक

मालवणच्या परीट समाजाकडून विशेष सत्कार

मालवण : महेश कदम
        पुणे आंबेगाव येथील शिवसृष्टी व शिवकाळातील विविध प्रसंग आपल्या रीलद्वारे प्रभावीपणे मांडणाऱ्या मालवण येथील सिद्धेश अर्जुन चव्हाण याच्या रीलने स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
पुणे आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी शिवपार्क’मध्ये आयोजित बक्षीस वितरण समारंभात राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सिद्धेश चव्हाण याला १ लाख ४० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
     सिद्धेश हा श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, मालवण या संस्थेचे सदस्य अर्जुन चव्हाण यांचा मुलगा आहे. त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल मालवण तालुका परीट समाज बांधव व भगिनींच्या वतीने उमेश चव्हाण यांच्या निवासस्थानी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन वालकर, ज्येष्ठ सदस्य व खजिनदार आप्पा परुळेकर यांच्या हस्ते सिद्धेशचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांनी त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
      या सत्कार सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष विजय नेमळेकर, सचिव विनायक चव्हाण, माजी अध्यक्ष अजित चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष किरण चव्हाण, तसेच सदस्य सत्यवान चव्हाण, उमेश चव्हाण, शिवाजी परीट, अशोक नेमळेकर, अर्जुन चव्हाण, शुभम चव्हाण, संतोष चव्हाण, निलेश चव्हाण, सुभाष चव्हाण, आणि सदस्या रिया परुळेकर, अंकिता नेमळेकर, अश्विनी चव्हाण, शैलजा चव्हाण, साक्षी चव्हाण, अरुणा चव्हाण यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!