
किनळोस धनगरमाळा येथे जलसंधारणासाठी श्रमदान; पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला चालना
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज किनळोस धनगरमाळा येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या अश्विनी सावंत, माजी सरपंच उदय सावंत, तुळसुली कर्याद नारूर सरपंच नूतन आईर, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, निवजे शाखाप्रमुख सीताराम चव्हाण, उपतालुकाप्रमुख संजय सावंत, युवक विभागप्रमुख तुषार परब, बीएलए विभागीय संयोजक सजूराम नाईक, अमित तावडे, आवळेगाव शाखाप्रमुख विनोद सावंत, गिरगाव शाखाप्रमुख सुशील तांबे, कदमवाडी शाखाप्रमुख शिवाजी कदम, हिर्लोक शाखाप्रमुख निनाद परब, वेताळ बांबर्डे शाखाप्रमुख निलेश बांबर्डेकर, रांगणा-तुळसुली शाखाप्रमुख सुभाष तुळसुलकर, माजी सरपंच कानू शेळके, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत,किनळोस शाखा प्रमुख अक्षय सावंत, कुसगाव शाखा प्रमुख नारायण आचरेकर, बीएलए पांडुरंग गावडे, जयराम सावंत, पोलीस पाटील जानकर, प्रकाश सावंत, रवी सावंत आणि अजय कदम आदी सहभागी झाले होते.








