ठळक घडामोडी

कुडाळ भंगसाळ नदीचे पाणी तातडीने अडवा – नगरसेवक मंदार शिरसाट!

प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा

कुडाळ : प्रतिनिधी
    यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असून कुडाळ शहरावर देखील भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. येथील भंगसाळ नदीचे पाणी तातडीने न अडवल्यास संपूर्ण शहराला येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच, लघु पाटबंधारे विभागाने येत्या ७ दिवसांत नदीचे पाणी अडवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर विभागाच्या कार्यालयाला तीव्र घेराव घालण्यात येईल, असा थेट इशारा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
      या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तात्कळ बंधारा घातल्यास कुडाळ शहराच्या पाणी पुरवठा योजना सुरळीत चालतील आणि परिसरातील विहिरींची भूगर्भ जलपातळी टिकून राहील मात्र, लघु पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे अद्याप पाणी अडवण्याचे काम सुरू झालेले नाही. नदीचे पाणी वाया जात आहे. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ जागे होणे गरजेचे आहे. जर पुढील ७ दिवसांत लघु पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे काम सुरू करून पाणी अडवले नाही, तर कुडाळच्या जनतेला सोबत घेऊन कार्यालयाला घेराव घातला जाईल आणि होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल, असे मंदार शिरसाट यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!