ठळक घडामोडी

वेंगुर्ले शिवसेना (उबाठा) शाखेत माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन!

सपत्नीक उपस्थिती; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

वेंगुर्ले : प्रतिनिधी
     वेंगुर्ले तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वेंगुर्ले शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आज याठिकाणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
     याप्रसंगी स्नेहा वैभव नाईक, वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य संजय गावडे, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, वेंगुर्ले शहरप्रमुख शैलेश परुळेकर,  सुजित चमणकर, अजित राऊळ,महिला आघाडी तालूका संघटक साक्षी चमणकर, डीजी कक्ष तालुका समन्वयक ओंकार पंडित, अजिंक्य खोत, डेलिन डिसोझा, वैभव फटजी, अभि मांजरेकर, अपेक्षा बागायत, कोमल सरमळकर, सुहास मेस्त्री, दिलीप राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!