ठळक घडामोडी

कुडाळमध्ये ‘नॅशनल मोटार सायकल रॅली’चे स्वागत!

अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश

प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे व पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची उपस्थिती

कुडाळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या अनुषंगाने ‘नॅशनल मोटार सायकल रॅली-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे आज महाराष्ट्रात आगमन झाले असून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले. ‘Fight Against Drugs’ हा संदेश देत निघालेली ही रॅली आज सकाळी कुडाळ येथे दाखल झाली. यावेळी कुडाळ हायस्कूल येथे उपविभागीय अधिकारी (प्रांत) ऐश्वर्या काळुशे आणि पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
      राष्ट्रीय एकात्मता आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृती हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. गोवा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप येथील पोलीस संघांतील एकूण ४६ मोटारसायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर हि रॅली कुडाळात दाखल झाली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुडाळ हायस्कूल संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कुडाळमधील स्वागतानंतर ही रॅली कणकवलीच्या दिशेने रवाना झाली.

error: Content is protected !!