
महिलांच्या हाताला काम, घराघरांत रोजगार; कुडाळमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षणाला प्रारंभ
फॅब्रिक पेंटिंगपासून आकर्षक भेटवस्तू निर्मितीपर्यंत प्रशिक्षण; महिलांना स्वावलंबनाची संधी
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे रोजगार अभियान आपल्याला यशस्वी करायचे आहे. प्रत्येक गावात रणरागिणीनी ही मोहीम हाती घेऊन वाटचाल करावी भविष्यात ही चळवळ राज्यभर पोचली पाहिजे असे प्रतिपादन कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिकच्या अध्यक्ष डॉ.सुनिता मोडक यांनी आज उद्योजकता विकास अभियान अंतर्गत गाव तिथे रोजगार कार्यक्रमात कुडाळ येथे केले.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मितीनंतर रोजगार हमी योजना अंतर्गत महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन कुडाळ येथील दैवज्ञ समाज भवन, कुडाळ येथे आज व उद्या करण्यात आले आहे. या
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी फाईन आर्टिस्ट आणि क्राफ्ट ट्रेनर नाशिक सौ. नंदिनी रामचंदानी, आश्रय प्रतिष्ठान अध्यक्ष माधव गोरे, मणिकर्णिका अध्यक्ष उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरुड, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, जेष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर मृणाल सावंत कीर्ती पाटील, पुजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी ,दर्शना धुरी,दर्शना मार्गी ,प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ.मोडक म्हणाल्या,महिला सबलीकरण झाले पाहिजे त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी कल्याणी आणि आश्रय प्रतिष्ठान काम करत आहे. सामाजिक काम करताना अनेक अडचणी असतात मात्र या अडचणीवर मात करून जो यशस्वी तो खरा स्पर्धेत टिकतो. चांगले काम करताना यश उशिरा मिळते पण ते यश चिरकाल टिकते. महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे गाव तिथे रोजगार नाही तर घर तिथं रोजगार गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. भविष्यात सर्वांना क्लस्टर मध्ये उतरायचे आहे असे सांगून
सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला जिल्हा आहे. अशा जिल्ह्यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कुडाळ येथील पुरुषांची वटपौर्णिमा आणि दुर्गा दौड हे राज्यासाठी आदर्शवत आहे
असे सांगितले.
यावेळी बोलताना उन्मेषा दाभोलकर म्हणाल्या, महिला ही जीवनाचा आधार शिवणकाम करून मिळवते .सन्मान आत्मनिर्भरता हाच तिचा शृंगार आहे. प्रत्येक स्त्री स्वयं सिद्धा स्वयं उद्योजकता होईल तिचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण वाटचाल करत आहोत असे सांगितले.
या शिबिरात सौ. नंदिनी रामचंदानी यांनी फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षण अंतर्गत कापडासाठी योग्य रंगाची निवड, ब्रश आणि विविध चित्रकला तंत्र ,फुलांचे पारंपारिक आधुनिक डिझाईन, स्टेनलीस तंत्र ,रंगाचे मिश्रण आणि शेडिंग , कापडावरील रंग जास्त काळ टिकण्यासाठी योग्य पद्धती रेझिंन ट्रे, कोस्टर, कीचेन फोटो फ्रेम, आरती थाळी पिलर मेणबत्ती, स्तंभाकार मेणबत्ती फॅन्सी दिवा मेणबत्ती लाडू मेणबत्ती सुगंधी जार मणबत्ती पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रावर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि एनव्होलप तयार करणे आदी विविध प्रकारचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले .







