ठळक घडामोडी

दोडामार्ग येथील जनआरोग्यम् जेनेरिक मेडिकलला एसपीएस फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट!

जेनेरिक औषध विक्रीपासून व्यवसायाच्या संधींपर्यंत; फार्मसी विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष ज्ञान

कुडाळ : ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जेनेरिक औषध विक्रीच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील वाडीहुमरमळा (डिगस) येथील श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या (B. Pharm) विद्यार्थ्यांनी दोडामार्ग येथील सिद्धिविनायक जनआरोग्यम् जेनेरिक मेडिकल स्टोअरला (जनआरोग्यम् जेनेरिक प्रायव्हेट लिमिटेड) शैक्षणिक भेट दिली. 
     अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील व्यावसायिक संधी, रिटेल औषध वितरण, साठा व्यवस्थापन आणि औषध कायद्यांशी संबंधित नियमांची सविस्तर माहिती घेतली.
    या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी
किफायतशीर आरोग्यसेवा व व्यवसाय मॉडेल, ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांचे मूल्य आणि रुग्णांना थेट मिळणारा आर्थिक फायदा यावर चर्चा केली.
इन्व्हेंटरी व कोल्ड चेन व्यवस्थापन; इन्सुलिन, लस आणि इतर नाजूक औषधांसाठी लागणारी शीतसाखळी (Cold Chain) तसेच कालबाह्य (Expiry) औषधांचे नियंत्रण कसे केले जाते, याची माहिती घेतली. ग्राहक समुपदेशन (Patient Counseling), ग्राहकांमध्ये जेनेरिक औषधांविषयी असलेला विश्वास वाढवण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची अचूक तपासणी याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
       स्टार्टअप व रोजगार संधी
       पदवीनंतर स्वतःचे रिटेल मेडिकल स्टोअर किंवा फ्रँचायझी सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल, एफडीए (FDA) परवाने आणि नफ्याचे प्रमाण यावर तज्ज्ञांकडून यावेळी मार्गदर्शन झाले.
   या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच रिटेल फार्मसी व्यवसायातील प्रत्यक्ष आव्हाने व संधी जवळून समजून घेता आल्या. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!