
मेकॅनिकच्या हितासाठी दोन्ही संघटना एकत्र; समस्यांवर सामूहिक तोडगा काढण्याचा निर्धार
कुडाळ तालुका मेकॅनिक असोसिएशनच्या पाठीशी रत्नागिरी जिल्हा संघटना ठामपणे उभी राहणार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांची संयुक्त बैठक नुकतीच कुडाळ येथे झाली.
यावेळी एकता रत्नागिरी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे जिल्हाअध्यक्ष फैयाज खतीब, जिल्हा सचिव धनंजय कदम, जिल्हा संघटक पारस खानविलकर, अध्यक्ष पावस विभाग महेश पालकर, ज्येष्ठ पदाधिकारी जितेंद्र भुते, कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर, उपाध्यक्ष संदेश गावकर, सचिव गुरुनाथ धुरी, सहसचिव शंकर सातार्डेकर, खजिनदार मोहित मेथर, सह खजिनदार सचिन परब, कुडाळ शहर प्रमुख दिवाकर मांजरेकर, उप शहर प्रमुख प्रकाश सातार्डेकर,
सदस्य महेश मिटकर, सावळाराम जळवी, सुनील पावसकर, संदीप गावडे, भूषण गोसावी, स्नेहसागर तुळसकर, अमित पेडणेकर, दीपेश नाईक, संजय धुरी, राजेश कुडाळकर, संतोष गवंडे, रविकिरण कविटकर, संतोष शेलटकर, नितीन परब, राहुल जळवी, दशरथ आडेकर, किरण पवार, रामकृष्ण हळदणकर, मुकेश परब आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे सचिव गुरुनाथ धुरी यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब यांनी आपले संघटनेबाबतचे विचार व्यक्त केले. आपली संघटना उभी करत असतानाचे आपले अनुभव त्यांनी सांगितले तसेच कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने जिल्हा संघटना विस्तारासाठी प्रयत्नशील राहावे यासाठी ज्या ज्या वेळी आपली गरज असेल तेव्हा एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन सदैव आपल्या सोबत राहील असे त्यांनी सांगितले. आगामी काळात येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना यावर दोघांमध्येही सविस्तर चर्चा झाली. आपल्या प्रत्येक मेकॅनिकचे हित हेच आपल्या संघटनेचे ध्येय असेल. इतर चर्चा करत असताना कुडाळ असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या काही समस्या व्यक्त केल्या त्याच्यावर आपण सर्व मिळून एकत्र काम करू, प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेत असताना एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.
येत्या काळात असोसिएशनची वाटचाल काय असेल यावर दोन्ही असोसिएशनची चर्चा झाली. शेवटी सहसचिव शंकर सातार्डेकर यांनी कायमान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम पूर्ण झाल्याचे जाहीर केले.








