ठळक घडामोडी

51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवडलेल्या 1,183 ग्रंथांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध!

सूचना, हरकती व आक्षेप नोंदविण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत

सिंधुदुर्गनगरी : ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या 1 हजार 183 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 16 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
      सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी या ग्रंथांची निवड केली आहे. यामध्ये 685 मराठी, 246 हिंदी आणि 252 इंग्रजी ग्रंथांचा समावेश आहे. यादीतील ग्रंथांचे वितरण संचालनालयाच्या नियमानुसार 25 टक्के ग्रंथसूटदराने करणे बंधनकारक आहे.
या यादीतील ग्रंथांच्या नावांबाबत, लेखक, प्रकाशक किंवा किमतींबाबत काही बदल, त्रुटी अथवा अन्य बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबतच्या सूचना, हरकती व आक्षेप दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करता येतील. यासाठी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400 001 यांच्याकडे कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने किंवा टपालाद्वारे लेखी स्वरूपात सूचना पाठवाव्यात. तसेच संचालनालयाने नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावरही मुदतीत सूचना सादर करता येतील.ग्रंथांच्या यादीतील नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यांमध्ये काही बदल असल्यास ते संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!