ठळक घडामोडी

तेरेखोल नदीत मायलेकाची उडी; मृतदेह सापडले!

सावंतवाडी : सातार्डा-रायाचेपेड येथील तेरेखोल खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मायलेकाचे मृतदेह अखेर स्थानिक ग्रामस्थांनी शोधून बाहेर काढले. ग्रामस्थांनी स्वतःहून राबविलेल्या शोधमोहिमेला यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, रायाचेपेड येथील ग्रामस्थांनी खाडीपात्रात शोधमोहीम सुरू केली होती. दोरीला दगड बांधून खाडीत शोध घेत असताना मृतदेहांचा सुगावा लागला. त्यानंतर होडीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान मायलेकाच्या मृतदेहांची स्थिती पाहून उपस्थित ग्रामस्थांचे मन हेलावून गेले. दोघांनीही खाडीत उडी घेताना एकमेकांचे हात साडीच्या चिंधीने घट्ट बांधल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन्ही मृतदेह एकमेकांना बांधलेल्या अवस्थेत सापडले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
      दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे सातार्डा आणि आरोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!