
बिबवणे येथे डंपरला अचानक भीषण आग
कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका डंपरला आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सदर डंपर कुडाळच्या दिशेने जात होता. या घटनेदरम्यान महामार्गावरील मुंबईकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कुडाळ पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत डंपरचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. कोघटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.



