ठळक घडामोडी

महाराष्ट्रातील २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी!

मुंबई : महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील २.५ लाखांहून अधिक वंचित युवकांपर्यंत पुढील पाच वर्षांत पोहोचून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
       मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये जीवन कौशल्ये, रोजगारक्षमतेचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि रोजगाराशी जोडणी यांचा एकात्मिक समावेश आहे. महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, ग्रामीण उद्योजकता वाढविणे तसेच पदवीधर युवकांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या शासनाच्या प्राधान्यक्रमांशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
       या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य विभागामार्फत करण्यात येईल. तसेच निधीचे अभिसरण आणि औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

error: Content is protected !!