ठळक घडामोडी

पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा;विविध विभागांच्या कामांचा घेणार आढावा!

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव वीरेंद्र सिंह हे शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा, दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच विविध शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी करणार आहेत.
       दौऱ्याच्या नियोजनानुसार, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवरील विभागीय कामकाज, जिल्हा परिषद विभागाचा आढावा आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनांसाठी प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा बैठक होणार आहे.
       यानंतर ओरोस येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देण्यात येणार आहे. नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सोशल मीडिया लॅबची पाहणी करण्यात येईल. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात येणार असून, त्यानंतर तुळस तलाठी कार्यालयाची पाहणी करण्यात येईल. मातोंड ग्रामपंचायतीला भेट देऊन मातोंड येथील वनराई बंधाऱ्याची पाहणी केली जाणार आहे.
       सायंकाळी वेंगुर्ला नगरपालिकेच्या कार्यालयास भेट देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेंगुर्ला येथील कौशल्य विकास लॅब आणि नमो गार्डनलाही भेट देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!