ठळक घडामोडी

पणदूर येथे शेतकरी मेळावा उत्साहात!

‘मान्सून धमाका २०२६’ उपक्रमाचे ११ वे वर्ष

काजवा शेतकरी सेवा केंद्र,पणदूरचे यशस्वी आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
      कर्नूल सीड्स प्रा. लि. आणि सायनोरा क्रॉप सायन्सेस प्रा. लि. यांच्या प्रायोजकत्वाखाली तसेच काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व ‘मान्सून धमाका २०२६’ हा उपक्रम रविवारी पणदूर येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष होते. या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पणदूर येथील श्री सद्गुरू कृपा मंगल कार्यालयात दुपारी २ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत आयोजित या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि शेतीतील नवनवीन प्रयोगांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेती अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा मेळाव्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी कर्नूल सीड्स प्रा. लि.चे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र गोपाळे आणि सायनोरा क्रॉप सायन्सेस, हैदराबादचे महाव्यवस्थापक श्रीकांत रेड्डी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
       या कार्यक्रमाला उर्जित बायोटेक प्रा. लि., सांगलीचे श्री.गोरे, माऊली ॲग्रो एजन्सीज, कोल्हापूरचे समाधान येडगे, कावेरी सीड्सचे चंद्रदीप देसाई, सवाना सीड्सचे विभागीय अधिकारी दिगंबर चव्हाण, श्रीकर सीड्सचे श्री. कावळे, निर्मल सीड्सचे संतोष पाटील आणि राजू साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याबद्दल दादा साईल यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. शेतकरी बांधवांची प्रगती हीच ग्रामीण विकासाची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!