
अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळेची पाहणी
आरोग्य, ग्रामविकास व शैक्षणिक उपक्रमांचा घेतला आढावा
कुडाळ : कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज वालावल येथे भेट देत आरोग्य, ग्रामविकास आणि शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दंतनाशक मोहिमेची माहिती जाणून घेत आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांची पाहणी करून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी सरपंच राजेश प्रभू व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील बांधकाम, अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी मुख्याध्यापिका ऋतुजा गोसावी, अंगणवाडी कर्मचारी प्रणाली कविटकर, रोहिणी गोवेकर उपस्थित होत्या. आरोग्य विभागाच्या भेटीदरम्यान आशा स्वयंसेविका प्राजक्ता चव्हाण, अर्चना रेडकर, समुदाय आरोग्य अधिकारी श्रद्धा परब आणि आरोग्य सहाय्यिका साक्षी मेस्त्री उपस्थित होत्या.




