ठळक घडामोडी

कुडाळ रेल्वेस्टेशन-बांव रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक!

दिवाळीपूर्वी दुरूस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन

काम न झाल्यास ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

कुडाळ : कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशन व बांवकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयावर आज सकाळी धडक दिली. यावेळी  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दूरवस्थेवरून जाब विचारण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे हा रस्ता दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त करून दिवाळीनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. तर सहायक अभियंता धीरजकुमार पिसाळ यांना निवेदन देण्यात आले.
       कुडाळ रेल्वेस्टेशन व बांवकडे जाणारा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपती सणापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, अद्याप हा रस्ता जैसे थे परिस्थितीत असून दिवाळी सणापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. जर रस्त्याचे काम दिवाळी सणापूर्वी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
       यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट,  बाळा पावसकर, अमित राणे, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, गुरु गडकर, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संजय बोभाटे, शैलेश जळवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!