ठळक घडामोडी

कुडाळात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; मोटारसायकलस्वाराचा मृत्यू!

मोटरसायकलची ट्रकला मागून धडक

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर लेमन ग्रास हाॅटेल समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. हा अपघात पावणेपाच वाजताच्या सुमारास झाला.
     मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक लेनलगत उभा होता. दरम्यानच्या वेळेस कुडाळच्या दिशेने येणा-या मोटरसायकलची ट्रकला मागून जोराची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचे दुर्देवी निधन झाले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!