
बुवा दिपक नानचे, उदय पारकर व दिनेश वागदेकर यांच्यात रंगणार आमने-सामने तिरंगी डबलबारी
अमरसेन सावंत मित्रमंडळाचे आयोजन
कुडाळ : डिगसचे माजी सरपंच कै. शंकर उर्फ बाळू गावडे आणि माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्रमंडळाच्या वतीने शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पणदूरतिठा येथील श्री गणेश मंदिरासमोर तिरंगी डबलबारी भजनांचा आमने-सामने जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये माणगाव-कुडाळ येथील श्री वेतोबा प्रासादिक भजन मंडळाचे बुवा दीपक नानचे (पखवाज साथ बाबू खडपकर आणि तबलासाथ ऋषी ताम्हाणेकर) विरूद्ध कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळाचे बुवा उदय पारकर (पखवाजसाथ संकेत पवार व मिलिंद लाड, तर तबलासाथ भावेश लाड) विरूद्ध वेंगुर्ला तालुक्यातील शेळपी येथील श्री डुंगो कमला प्रासादिक भजन मंडळाचे बुवा दिनेश वागदेकर (पखवाज साथ सचिन राणे आणि तबलासाथ अजित मार्गी) यांच्यात हा सामना रंगणार आहे. या तिरंगी डबलबारी भजन सामन्याचा भजनप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमरसेन सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






