
हिर्लोकमध्ये सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा कार्यक्रमात कुडाळ ICDS चा उपक्रम

कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, कुडाळ तालुका आरोग्य विभाग आणि हिर्लोक आयुष्यमान आरोग्य मंदिर हिर्लोक यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिर्लोक येथे सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात कुडाळ तालुका महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने सर्व योजना अर्ज लाभार्थ्यांना स्कॅनरच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. तसेच जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते सॅम बालकाला फ्रुट आहार वाटप करण्यात आला.
यावेळी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, जि.प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, जि.प.सदस्य नागेश आईर, दिपक नारकर, रूपेश कानडे, दिपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका मंगला सुतार व शर्मिला वळवी-वसावे, आरोग्य विस्तार अधिकारी धनवे, आर.डी.चेंदवणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक तसेच हिर्लोक बिटच्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.








