ठळक घडामोडी

पिंगुळी पाझर तलावप्रश्नी ग्रामस्थांच्या उपोषणाला ठाकरे शिवसेनेचा जाहीर पाठिंबा!

कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांची माहीती

कुडाळ : पिंगुळी देऊळवाडी येथील पाझर तलावाच्या रक्षणासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी पासून पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची माहीती कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी दिली.
      श्री.नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ग्रामस्थांनी जो बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे, तो योग्य असून त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्याचा पूर्ण पाठिंबा असून या लढ्यात आम्ही सहभागी असून आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे भूमिका तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी स्पष्ट केली आहे.

error: Content is protected !!