ठळक घडामोडी

कुडाळ MIDC कॉर्नर ते पिंगुळी रस्ता होणार काँक्रीटचा; आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन!

कुडाळमधील ३५ कोटींच्या रस्ते कामाचा उद्या शुक्रवारी शुभारंभ

वाहतूककोंडी सुटण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ शहरातील MIDC कॉर्नर ते पिंगुळी म्हापसेकर तिठा तसेच MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरणासह काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून एकूण ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजन उद्या, शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते MIDC कॉर्नर येथे होणार आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे कुडाळ शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!