
पणदूर, वेताळबांबर्डे परिसरात जोरदार सरी
ऐन भातकापणी हंगामात शेतकऱ्यांसमोर संकट
सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या काही भागांत आज रविवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. वैभववाडी, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस बरसला. कुडाळ तालुक्याच्या पणदूर, वेताळबांबर्डे पंचक्रोशीसह अनेक भागांत सायंकाळी पावणे सात ते सात वाजताच्या सुमारास पाऊस बरसत होता. या अचानक आलेल्या पावसाने दुचाकीधारक तसेच नागरीकांची त्रेधातिरपीट उडाली. तर सध्या सर्वत्र भातकापणी जोरात सुरू आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत असून शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.








