
श्री दत्तगुरूंसह यक्षिणी मातेचे घेतले दर्शन
दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान
कुडाळ : प्रतिनिधी
गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माणगाव येथील प्रसिद्ध श्री दत्तमंदिराला सदिच्छा भेट देत श्री दत्तगुरूंचे तसेच ग्रामदेवता यक्षिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी माणगाव दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष भिसे यांनी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिरातील धार्मिक वातावरणात त्यांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. दर्शन घेऊन ते कुडाळच्या दिशेने मार्गस्थ झाले.








