
ग्रामस्थांसह सर्वपक्षीय एकवटले
कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर आज सोमवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तलावाकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप करत, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. ल.पा. सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या मालकीचे तलावाचे विकासकाद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी होत असलेल्या बेकायदेशिर जाहिराती बाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा. ल.पा. सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या मालकीचे तलावातील अतिक्रमण हटविण्या बाबत कारवाई करावी. पाझर तलावातील पाणी प्रदूषित होणार नाही याच्या संरक्षणाची हमी द्या. झालेल्या वृक्ष तोडीवर कायदेशिर कारवाई करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. जे.सी.बी. च्या आधारे चालू असलेले माती उत्खनन थांबविण्यासाठी त्वरीत आदेश द्यावेत. तलावाकडे जाणारे पंरपरागत वहीवाटीचे रस्ते खुले करावे. वन्यजीव पाण्यांचे हक्काचे पाणी व लगतच्या निसर्ग संरक्षित करून बंगलो प्रकल्प रद्द करा. पिंगुळी गावच्या हक्काचे पाझर तलावाचे पाणी ग्रामस्थांसाठीच संरक्षित करावे अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
ग्रामस्थांनी उभारलेल्या या लढ्याला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी पाठींबा दिला. यावेळी जि.प.सदस्य रूपेश पावसकर, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, विजय प्रभू, नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट, संजय वेतुरेकर, रूपेश पावसकर, शिवाजी घोगळे, राजन नाईक, बबन बोभाटे, अतुल बंगे, श्रेया परब, राजन पांचाळ, दीपक गावडे, मिलिंद परब, ममता राऊळ, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, मंदार चंद्रकांत शिरसाट, प्रदीप माने, अनंत धुरी, दत्ता पाटील, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.








