ठळक घडामोडी

एनडीआरएफच्या निकषात केंद्राकडून वाढ!

नैसर्गिक आपत्ती बाधितांसह दुष्काळग्रस्तांना दिलासा

मंत्री नितेश राणे यांची माहिती

मुंबई/सिंधुदुर्ग : केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) मदतीच्या निकषांत वाढ केली आहे. नवे सुधारित निकष २०२६–३१ या काळात लागू राहणार आहेत. या नव्या निकषांमुळे राज्यातील नैसर्गिक आपत्ती बाधितांना, दुष्काळ बाधितांना दिलासा मिळणार आहे, अशी माहीती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
      मत्स्य व्यवसायासाठीची प्रस्तावित मदत
     मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी ८ हजार रुपये.
जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ४ हजार रुपयांची मदत. पूर्ण नुकसान झालेल्या बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी १९ हजार. पूर्ण नुकसान जाळ्यांसाठी ५ हजार १०० रुपयांची मदत दिली जाईल. मत्स्यबीज फार्मसाठी लहान व सीमांत शेतकऱ्यांना १३ हजार प्रति हेक्टरी मदत दिली जाईल, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!