ठळक घडामोडी

बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा!

माजी आम. वैभव नाईक यांची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथे महालॅबमार्फत सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा बंद झाली आहे. हि सेवा देणाऱ्या एचएलएल कंपनीची दोन वर्षापासूनची देयके महायुती सरकारने थकीत ठेवल्याने हि सेवा बंद झाली आहे.त्यामुळे रुग्णांना खासगी तपासण्या कराव्या लागत असून त्याचा खर्च परवडत नसल्याने गरीब व गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा करुन प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली.या मागणीला ना.प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची ग्वाही दिली. यावेळी ठाकरे शिवसेना आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, भगवान परब आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!